धोनीला पाय रोवण्यास वेळ नाही लागत - अनिल कुंबळे

 महेंद्र सिंग धोनीच्या फिनिशनच्या भूमिकेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नावर चर्चा होत असताना त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला यायला पाहिजे, असाही सूर निघत आहे. त्यावर अनिल कुंबळेने धोनीची पाठराखण केली आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यांचा कर्णधार धोनी याला पीचवर पाय रोवण्यास कमी वेळ लागतो. त्याला यासाठी आवश्यक तो अनुभव आहे. त्यामुळे त्याला पीचवर अधिक काळ घालविण्याची गरज नाही. 

Updated: Oct 19, 2016, 05:12 PM IST
धोनीला पाय रोवण्यास वेळ नाही लागत - अनिल कुंबळे  title=

नवी दिल्ली :  महेंद्र सिंग धोनीच्या फिनिशनच्या भूमिकेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नावर चर्चा होत असताना त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला यायला पाहिजे, असाही सूर निघत आहे. त्यावर अनिल कुंबळेने धोनीची पाठराखण केली आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यांचा कर्णधार धोनी याला पीचवर पाय रोवण्यास कमी वेळ लागतो. त्याला यासाठी आवश्यक तो अनुभव आहे. त्यामुळे त्याला पीचवर अधिक काळ घालविण्याची गरज नाही. 

कुंबळेला विचारण्यात आले की, पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी धोनीला वरच्या क्रमांकावर खेळायला पाठविले पाहिजे.  त्यावर कुंबळे म्हणाला की, हे सर्व मॅचच्या परिस्थितीवर अवलंबून असते. लक्ष्यचा पाठलाग करताना अधिक अनुभवाची गरज पडते. जोपर्यंत धोनीचा प्रश्न आहे, त्याकडे खूप अनुभव आहे. त्याने अनेक वर्षापासून स्वतःला सिद्ध केले आहे. एक फलंदाज म्हणून त्याच्याकडे क्षमता आहे.