मैदानाबाहेरच धोनी आणि गेल एकमेकांना भिडले...

क्रिकेटचे दोन धुरंधर बॅटसमन महेंद्रसिंग धोनी आणि क्रिस गेल यांच्यात मैदानाबाहेरच तू-तू-मै-मै झाली... आणि दोघं एकमेकांना चांगलेच भिडले.

Updated: Nov 3, 2015, 03:53 PM IST
मैदानाबाहेरच धोनी आणि गेल एकमेकांना भिडले...  title=

नवी दिल्ली : क्रिकेटचे दोन धुरंधर बॅटसमन महेंद्रसिंग धोनी आणि क्रिस गेल यांच्यात मैदानाबाहेरच तू-तू-मै-मै झाली... आणि दोघं एकमेकांना चांगलेच भिडले.

घाबरू नका... त्यांच्यातील ही तू-तू-मै-मै खेळीमेळीच्या वातावरणात झाली. दिल्लीत 'यारी' या मॅक़्डोवेल नंबर - १ द्वारे आयोजित कार्यक्रमात धोनी आणि गेलनं एकमेकांची नक्कलही करून दाखवली.

पहिल्यांदा गेलनं धोनीच्या हेलीकॉप्टर शॉटची नक्कल करून दाखवली... मग धोनीनंही गेलच्या विकेटस् दरम्यान धावण्याच्या स्टाईलची नक्कल केली... उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला. 

त्यानंतर, गेलनं परत आपली बाजू सावरत, खरं म्हणजे मी विकेट घेताना सगळ्यात फास्ट धावतो... असं म्हटलं. मग, धोनीनंही मागे न राहता लगेचच, 'होय खरं आहे... गेल लेग स्टंप पासून ऑफ स्टंपपर्यंत खूपच फास्ट धावतो' असं म्हटल आणि उपस्थितांत पुन्हा एकदा खसखस पिकली. 

आपला कॉमेडियन अंदाज आणखी तेज करत मग, 'धोनीनं बोल्टही गेलकडूनच फास्ट धावणं शिकलाय.... गेल लांब-लांब सिक्सर ठोकत होता आणि बोल्ट तो पकडण्यासाठी धावत होता' असं म्हणत कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.