धोनीकडून विरोधकांची बोलती बंद, पाहा माहीची फटकेबाजी

यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर धोनीला सूर गवसला आहे. 

Updated: Apr 22, 2017, 08:46 PM IST
धोनीकडून विरोधकांची बोलती बंद, पाहा माहीची फटकेबाजी title=

पुणे : यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर धोनीला सूर गवसला आहे. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीनं ३४ बॉल्समध्ये ६१ रन्सची खेळी करून पुण्याच्या टीमला विजय मिळवून दिला. धोनीच्या या खेळीमध्ये ५ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.

विजयासाठी १७७ रन्सचा पाठलाग करताना एकावेळी हैदराबाद ही मॅच जिंकेल असं वाटत असतानाच मोक्याच्या क्षणी धोनीनं मॅच पुण्याच्या बाजूनं फिरवली. राहुल त्रिपाठीनेही ४१ चेंडूत ५९ धावा तडकावल्या. विजयासाठी हैदराबादने पुण्याला १७७ धावांचे आव्हान दिले होते. पुण्याने हे आव्हान ६ विकेट्स राखत पूर्ण केले.

गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीची कामगिरी साजेशी होत नाही. यावरुन त्याच्यावर टीका सुरु होती. या सामन्यातूने धोनीने त्याच्या टीकाकाराला प्रत्युत्तर दिले.

पाहा माहीची फटकेबाजी