महेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपनंतर घेणार निवृत्ती?

बातमी आहे क्रिकेट विश्वातून..... बातमी भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दलची आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे मोहम्मद शमीने प्रेस कॉन्फ्रेंन्समध्ये संकेत दिले आहे. 

Updated: Mar 13, 2015, 07:49 PM IST
महेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपनंतर घेणार निवृत्ती? title=

मुंबई : बातमी आहे क्रिकेट विश्वातून..... बातमी भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दलची आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे मोहम्मद शमीने प्रेस कॉन्फ्रेंन्समध्ये संकेत दिले आहे. 

झिंम्बाब्वे मॅच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रेस कॉन्फ्ररन्समध्ये शमी बोलत होता.  "आम्ही प्रत्येक मॅच गंभीरपणे घेत आहोत. आम्ही आमची विजयी घोडदौड चालू ठेवण्याचे प्रयत्न करणार आहोत. वर्ल्डकप २०११ भारतीय टीमने सचिन तेंडुलकरसाठी जिंकला होता. हा वर्ल्ड कपही काही खेळाडूंचा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. त्यामुळे हा वर्ल्डं कप आम्हाला त्यांच्यासाठी जिंकायचा आहे"  हे बोलल्यानतंर लगेचच "धोनी उत्कृष्ट कर्णधार आहे" या शमीच्या वक्तव्यामुळे धोनीच्या निवृत्तीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी २० वर्ल्डकप आणि २०११ साली वनडे वर्ल्डकप जिंकले आहेत. धोनीच्या कारकीर्दीतच भारतीय टीम टेस्टमध्ये नंबर वन टीम बनली होती.