धोनीची मुलगी झाली एक वर्षाची. साक्षीनं ट्विट केला माही-झिवाचा फोटो

भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची मुलगी झिवा एक वर्षाची झाली आहे.

Updated: Feb 6, 2016, 09:52 PM IST
धोनीची मुलगी झाली एक वर्षाची. साक्षीनं ट्विट केला माही-झिवाचा फोटो title=

मुंबई : भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची मुलगी झिवा एक वर्षाची झाली आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनीला कन्यारत्न प्राप्त झालं. झिवाच्या जन्माची ही खुशखबर धोनीला मिळाली तेव्हा तो 2015च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत होता.

वर्ल्ड कपच्या वेळीही त्यानं मुलीला भेटणं मिस करत असल्याचं सांगितलं, पण आता मात्र धोनी त्याच्या मुलीबरोबरचे क्षण एन्जॉय करतोय. 

धोनी आणि झिवाचा फोटो साक्षीनं ट्विट केला आहे. हॅपी बर्थ डे झिवा, आमच्या आयुष्यात तु आनंद आणलास, असं ट्विट साक्षीनं केलं आहे.  

याआधीही साक्षीनं झिवाचे काही व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले होते