विनोद कांबळीची अब्रू बँकेनं आणली चव्हाट्यावर...

माजी क्रिकेटर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा एकेकाळचा जीवलग मित्र विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आलाय... तो परतफेड न केलेल्या एका बँकेच्या कर्जामुळे...  

Updated: Jul 12, 2014, 03:47 PM IST
विनोद कांबळीची अब्रू बँकेनं आणली चव्हाट्यावर...

मुंबई : माजी क्रिकेटर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा एकेकाळचा जीवलग मित्र विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आलाय... तो परतफेड न केलेल्या एका बँकेच्या कर्जामुळे...  

विनोद कांबळी आणि वाद यांचं नातं अतूट असल्यासारखं अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांसाठी किंवा गोष्टींसाठी विनोदची चर्चा जास्त होताना दिसते. आता, विनोद चर्चेत आलाय तो डोंबिवली नागरी सहकारी बँकेनं (डीएनएसबी) दिलेल्या एका जाहिरातीमुळे... 

विनोदनं आणि त्याच्या पत्नीनं बँकेकडून घेतलेलं कर्ज घेतलं होतं. वारंवार नोटीस बजावूनही विनोदनं प्रतिसाद न दिल्यानं बँकेनं आता या पती–पत्नीवर कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय निवडलाय. बँकेनं त्यांच्या मालमत्तेच्या जप्तीसाठी पावले उचललेली आहेत. 

यापूर्वी, बँकेच्या अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी विनोद आणि त्याच्या पत्नीला संपर्क केला असता त्याच्या पत्नीनं अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. 

काय म्हटलंय बँकेनं जाहिरातीत... पाहा... 

vinod_kambli

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.