विराट आणि सचिनची तुलना नको: लता मंगेशकर

सचिन तेंडुलकरची तुलना विराट कोहलीशी करण्यात येऊ नये, असं मत गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केले आहे. 

Updated: Mar 31, 2016, 03:43 PM IST
विराट आणि सचिनची तुलना नको: लता मंगेशकर title=

मुंबई : सचिन तेंडुलकरची तुलना विराट कोहलीशी करण्यात येऊ नये, असं मत गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केले आहे. 

विराट आपल्या सहजसुंदर खेळीने भारतास उपांत्य फेरीतील पोहोचवण्यास सिंहाचा वाटा उचलतोय, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे, तरी त्याची सचिन तेंडुलकरबरोबर तुलना करण्यात येऊ नये, असे लता मंगेशकर यांनी म्हटलंय.

लता मंगेशकर म्हणाल्या, 'सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना करने योग्य नाही. दोन्ही खेळाडू त्यांच्या स्थानी श्रेष्ठच आहेत. मात्र सचिनची तुलना कोणाबरोबरही करणे योग्य नाही. विराटचे भविष्य उज्ज्वल आहे, यात काहीही शंकाच नाही; परंतु सचिनची फलंदाजी ही एका दीर्घ तपश्‍चर्येनंतर आकारास आली आहे'.