इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचा घोंगणा फोडला

लंडन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू नाकाम झाला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या नाकाला बॉल लागल्याने तो जायबंदी झाला. हेल्मेट असूनही वेगात आलेला बॉल थेट हेल्मेटमध्ये जावून स्टुअर्ट ब्रॉडच्या नाकावर बसला आणि तो रक्तबंबाळ झाला.

Updated: Aug 9, 2014, 09:51 PM IST
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचा घोंगणा फोडला title=

लंडन : येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू नाकाम झाला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या नाकाला बॉल लागल्याने तो जायबंदी झाला. हेल्मेट असूनही वेगात आलेला बॉल थेट हेल्मेटमध्ये जावून स्टुअर्ट ब्रॉडच्या नाकावर बसला आणि तो रक्तबंबाळ झाला.

ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर मँचेस्टर येथे चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड खेळत असताना भारतीय बॉलर वरुण एरॉनचा बॉल थेट ब्रॉडच्या नाकावर बसला. बॉलचा वेग इतका होता की चक्क हेल्मेटमध्येच गेला. बॉलच्या दणक्याने ब्रॉडच्या नाकाचा घोंगणा फुटला आणि भळाभळा रक्तच आले.

उपचारासाठी तात्काळ डॉक्टरांना मैदानावर पाचारण करण्यात आले. मात्र, रक्त थांबण्याचे नावच घेईना. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉडला मैदान सोडावे लागले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.