इंग्लिश खेळाडू सेक्सचे भुकेले - विलिस

इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार बॉब विलिस यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. इंग्लिश खेळाडू हे सेक्सचे भुकेले आहेत. ते जास्त सेक्समध्ये रुची दाखवत असल्याचे विलिस यांनी म्हटले आहे.

Updated: Jul 22, 2014, 10:30 PM IST
इंग्लिश खेळाडू सेक्सचे भुकेले - विलिस title=

लंडन : इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार बॉब विलिस यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. इंग्लिश खेळाडू हे सेक्सचे भुकेले आहेत. ते जास्त सेक्समध्ये रुची दाखवत असल्याचे विलिस यांनी म्हटले आहे.

लॉ़डर्स मैदानावर टीम इंडियाकडून इंग्लंडला कसोटी सामन्यात ९५ रन्सने हार पत्करावी लागली होती. यावर टीका करताना विलिस यांनी हा हल्लाबोल केलाय. जे लोक नाइटलाईफमध्ये रुची दाखवतात. तसाच प्रकार इंग्लिश खेळाडू करताना दिसत आहे.

लंडनमधील एका टिव्ही शो कार्यक्रमात बॉबी विलिस यांनी हा गौप्यस्फोट केलाय. इंग्लंडची टीम सोहो सेपेक्षा अधिक 'हॅपी हुकर्स' आहेत. सोहो वेस्ट अॅण्ड लंडनमधील नाइटलाईफ हा रेडलाईट परिसर ओळखला जातो. आता येथे बदल दिसून येत आहे. या वेश्याव्यवसाय परिसरात  फॅशन्स संदर्भात दुकाने, रेस्तरा आणि मीडिया कार्यालये उघडण्यात आली आहेत.

विलिस हे ३२५ विकेट घेणारे जेम्स अॅंडरसन (३६४) आणि इयान बॉथम (३८३) यांच्या नंतर इंग्लंडमधील तिसरे यशस्वी गोलंदाज आहेत. भारताच्या इशांत शर्माच्या यशस्वी गोलंदाजीपुढे विश्वविजेता खेळाडूंचे शॉट चांगले नव्हते. त्यामुळे ते अयशस्वी ठरलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.