सुधीरच्या मिस्ड कॉलवर सचिन करतो 'कॉल बॅक'...

बांग्लादेशच्या समर्थकांनी सचिन तेंडुलकरचा आणि 'टीम इंडिया'चा फॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर गौतम याच्यावर हल्ला केला. पण, त्यांना सुधीर हा क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनचा किती मोठा फॅन आहे, याची कल्पना नसावी.

Updated: Jun 23, 2015, 12:36 PM IST
सुधीरच्या मिस्ड कॉलवर सचिन करतो 'कॉल बॅक'...  title=

नवी दिल्ली : 'जंटलमन गेम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'क्रिकेट'च्या मैदानात सर्वांनाच लाजवून टाकेन अशी एक घटना रविवारी भारत-बांग्लादेश सामन्यानंतर घडली. बांग्लादेशच्या समर्थकांनी सचिन तेंडुलकरचा आणि 'टीम इंडिया'चा फॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर गौतम याच्यावर हल्ला केला. पण, त्यांना सुधीर हा क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनचा किती मोठा फॅन आहे, याची कल्पना नसावी.

उल्लेखनीय म्हणजे सुधीरच्या एका मिस्ड कॉलवर सचिन तेंडुलकर त्याला पुन्हा कॉलबॅक करतो... ही गोष्ट खुद्द सुधीरनंच एका एफएम चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. 

इतकंच नाही तर जेव्हा सचिन परदेशातही असतो तेव्हाही तो सुधीरला फोनचं बील जास्त पडू नये, यासाठी त्याला स्वत:च फोन करतो.

सचिनच्या घराचे दरवाजे सुधीरसाठी नेहमीच उघडे आहेत. अनेकदा, सकाळी ३ - ३.३० ला मुंबईत पोहचलेला सुधीर टॅक्सी घेऊन पहाटे ४ वाजेपर्यंत सचिनच्या घरी पोहचतो. तरीही सचिनच्या घरी त्याची एन्ट्री सहज होते... कोणत्याही अडथळ्याशिवाय... सचिनचे हे आपल्यावर उपकार असल्याचंच सुधीर मानतो.

नेमकं काय घडलं रविवारी मैदानात... 
रविवारी भारत - बांग्लादेश सामन्यात भारताला पराभव चाखावा लागला. या विजयाचा उन्माद भडकपणे खेळाडूंमध्ये दिसला नसला तरी बांग्लादेशच्या समर्थकांनी मात्र हा उन्माद सगळ्या जगला दाखवून दिलाय. 

या हल्ल्यात सुधीर थोडक्यात वाचला... दोन पोलिसांच्या मदतीनं तो स्टेडियमबाहेर येऊ शकला. सुधीरच्या म्हणण्यानुसार, मॅच संपल्यानंतर विजयाचा आनंद उडवणाऱ्या काही बांग्लादेशी फॅन्सनं सुधीरला पाहिलं तेव्हा ते त्याच्या पाठी पडले. यानंतर दोन पोलिसांनी सुधीरला तातडीनं एका रिक्षात बसवलं. पण, जेव्हा सुधीर रिक्षात बसत होता तेव्हाही त्याच्यावर दगड फेकले गेले. 
 
विजयाच्या उन्मादात बेभान झालेल्या बांग्लादेशी समर्थकांनी रिक्षाचे पडदेही फाडले. यावेळी, 'आम्ही वर्ल्डकप क्वार्टर फायनल पराभवाचा बदला घेतलाय' असं ते ओरडत होते. इतकंच नाही तर त्यांनी सुधीरला पकडून त्याची पॅन्ट उतरवण्याचाही प्रयत्न केला. 

बांग्लादेश समर्थकांनी केलेल्या या कृत्यानंतर सगळ्याच स्तरातून त्यांचा निषेध होतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.