‘मॅजिकल मेसी’ची टीम 24 वर्षांनी वर्ल्डकप फायनलमध्ये

अर्जेन्टीनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. 

PTI | Updated: Jul 10, 2014, 07:59 AM IST
‘मॅजिकल मेसी’ची टीम 24 वर्षांनी वर्ल्डकप फायनलमध्ये title=

साओ पाओलो : अर्जेन्टीनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. डच टीमचा लिओनेल मेसीच्या टीमनं पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 नं पराभव केला. गोलकीपर सर्गियो रोमेरो अर्जेन्टाईन टीमच्या विजयाचा शिल्पकार ठरला. आता फायनलमध्ये अर्जेन्टीनाला जर्मनीच्या टीमचा सामना करावा लागणार आहे. 

24 वर्षांनी फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचा आनंद काय असतो ते अर्जेन्टीनाच्या या विक्ट्री लॅपवरूनच दिसून आला. तर कायमच विजेतेपदाच्या एवढ जवळ येऊन हार पत्करावी लागल्यानंतर काय वाटतं हे ऑरेंज आर्मीच्या फुटबॉलपटूंच्या डोळ्यात पाहायला मिळालं.लिओनेल मेसीच्या टीमला आता तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे. 

सर्गियो रोमेरो या त्यांच्या गोलकीपरनं नेदरँलड्सच्या टीमचे दोन गोल अडवले. आणि आपल्या टीमला विजय साकारून दिला. 120 मिनिटं दोन्ही टीम्सच्या फुटबॉलपटूंना गोल करता आला नाही आणि मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. रोमेरोनं जिगरबाज खेळ करत आपल्या टीमला विजयश्री मिळवून दिली. डच टीमचा मसक्युलर सेंटर हाफ व्लारनं पहिली पेनल्टी घेतलं आणि रोमेरोनं ती अडवत आपल्या टीममध्ये नव चैतन्य निर्माण केलं. 

यानंतर ऑरोंज आर्मीचा अनुभवी फुटबॉलर वेस्ली श्नायडरचा गोल करण्याचा प्रयत्न त्यानं हाणून पाडत अर्जेन्टीनाच फायनल गाठणार यावर शिक्कामोर्तब केलं. अर्जेन्टीनाकडून लिओनेल मेसी, गेराय, सर्जियो अग्वेरो आणि मॅक्सी रॉड्गेज यांनी बॉल गोलपोस्टमध्ये धाडला. 

वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमी फायनलच्या मॅचचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. या विजयासह अर्जेन्टीनानं पाचव्या वर्ल्ड कपची फायनल गाठली. याआधी 1986 आणि 1990 मध्ये अर्जेन्टीनानं वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली होती. तर ऑरेंज आर्मीवरील चोकर्स हा शिक्का या पराभवामुळे कायम राहिला. 

या मॅचपूर्वी वर्ल्ड कपची फायनल ऑल युरोपियन टीम्समध्ये होते की साऊथ अमेरिकन विरुद्ध युरोपियन टीम अशी रंगणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र, मेसीची टीम जिंकल्यानंतर आता अर्जेन्टीना आणि जर्मनी यांच्यामध्ये फायनलचा मुकाबला होणार आहे. त्यामुळे फायनलमध्ये साऊथ अमेरिकन टीम बाजी मारते की, युरोपियन टीम विजय मिळवते याकडेच फुटबॉल चाहत्यांच लक्ष असेल.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.