भारत वि. इंग्लंड पहिली वन डे पावसामुळे रद्द

भारत विरूद्ध इंग्लड दरम्यान ब्रिस्टॉल येथे खेळविण्यात येणारा पहिला एक दिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.  पाच वन डे सामन्यांच्या सिरीजमधील दुसरा सामनना कार्डिफ येथील सोफिया गार्डन येथे २७ ऑगस्ट रोजी खेळविण्यात येणार आहे. 

Updated: Aug 25, 2014, 08:08 PM IST

ब्रिस्टॉल : भारत विरूद्ध इंग्लड दरम्यान ब्रिस्टॉल येथे खेळविण्यात येणारा पहिला एक दिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.  पाच वन डे सामन्यांच्या सिरीजमधील दुसरा सामनना कार्डिफ येथील सोफिया गार्डन येथे २७ ऑगस्ट रोजी खेळविण्यात येणार आहे. 

आज दुपारी ३ वाजता सामना सुरू होणार होता. मात्र, पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. सामनाधिकाऱ्यांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली. परंतु, बराच वेळ मुसळधार पावसाने मैदानात खराब झाले. सुमारे साडे तीन तास अंपारर्सने वाट पाहिली आणि भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे सहा वाजता हा सामना रद्द ठरविला. 

सामना रद्द झाल्याने खेळाडू आणि प्रेक्षकांचा हिरमोड झाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.