यंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!

2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया. 

PTI | Updated: Jul 14, 2014, 08:56 AM IST
यंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर! title=

रियो डि जनेरियो : 2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया. 

नोयानं आपल्या टीमसाठी कायमच तारणहाराची भूमिका बजावली. अर्जेन्टीनाविरुद्धच्या फायनल मॅचमध्येही त्यानं याचीच प्रचिती आणली. नोयानं अफलातून सेव्ह करत आपल्या टीमवर गोल होऊ दिले नाहीत. आणि त्यामुळंच नोया या वर्ल्ड कपच्या ‘गोल्डन ग्लोव्ह’चा मानकरी ठरला. 
 
तर दुसरीकडे फुटबॉल वर्ल्ड कपच्या रंगारंग क्लोजिंग सेरेमनीनं जगभरातील फुटबॉल फॅन्सची मनं जिंकली. पॉपस्टार शकिराच्या ला... ला.. ला.. गाण्यावर स्टेडियममधील फुचबॉल चाहत्यांनी ताल धरला. शकिराच्या गाण्याचा तडका या फुटबॉल सेरेमनीला चांगलाच लागलेला पाहायला मिळाला. या क्लोजिंग सेरेमनीमध्ये शकिराच खऱ्या अर्थानं सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन ठरली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.