सचिननंतर हे करणार वानखेडेवर क्रिकेटला अलविदा

विजय तांबे यांचा क्रिकेटला अलविदा 

Updated: May 1, 2016, 09:51 PM IST
सचिननंतर हे करणार वानखेडेवर क्रिकेटला अलविदा title=

मुंबई : क्रिकटेच्या विकासात केवळ क्रिकेटपटूंचंच योगदान नसतं तर क्रिकेटशी संबंधित स्टाफचंही तेवढाचं योगदान असतं. क्युरेटर आणि ग्राऊंड्समनचाही विजयात आणि पराभवतही तेवढाच वाटा असतो जेवढा एखाद्या क्रिकेटपटूचा. कारण जय-पराभवात विकेटची भुमिकादेखील तेवढीच महत्त्वाची ठरते.

विजय तांबे यांनीही क्रिकेटसाठी असंच योगदान दिलंय. विजय तांबे हे वानखेडेचे ग्राऊंड्समन्सचे हेड असून ते या महिन्यात निवृत्त होतं आहेत. जवळपास 36 वर्ष त्यांनी वानखेडे स्टेडियमची सेवा केली आहे. 2011 वर्ल्ड कप जिंकण्यात एकप्रकारे त्यांचही योगदान आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंना आपल्या डोळ्यासमोर लहाने मोठे होताना पाहिलं आणि अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द घडतानाही पाहिली. 

सचिनसारखे महान क्रिकेटपटू क्रिकेटसाठी योगदान देणा-या साध्या ग्राऊंडमनचीही अगदी नम्रपणे विचारपूस करतात हे विजय तांबे आवर्जून सांगतात. ज्या क्रिकेटपटूंवर बीसीसीआय आणि एमसीए कोट्यावधींची उधळण करत तेवढा पैसा मात्र या ग्राऊंड्समनला मिळत नाही याची खंत ग्राऊंड्समन्सना वाटते. 

1980मध्ये बीसीसीआयची सुवर्णमहोत्सवी टेस्ट ठरलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टसाठी त्यांनी सर्वात प्रथम विकेट बनवण्यात हातभार लावला होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआरविरुद्धची आयपीएल मॅच ही त्यांच्या कारकीर्दीतील अखेरची लढत ठरली. आता विजय तांबेदेखील क्रिकेटला अलविदा करत असून त्यांनीदेखील आपल्या परिनं क्रिकेटची एकप्रकारे सेवाच केली आहे हे विसरुन चालणार नाही.