सचिनसोबत मस्ती करतांना दिसली हरभजनची मुलगी

क्रिकेट जगतातला देव सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह यांचा एक फोटो सध्या समोर आला आहे. हरभजनची मुलगी हिनायासोबत सचिन मस्ती करतांना दिसत आहे. फोटोमध्ये हिनाया सचिनचे गाल खेचतांना दिसत आहे.

Updated: Feb 14, 2017, 08:13 PM IST
सचिनसोबत मस्ती करतांना दिसली हरभजनची मुलगी title=

मुंबई : क्रिकेट जगतातला देव सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह यांचा एक फोटो सध्या समोर आला आहे. हरभजनची मुलगी हिनायासोबत सचिन मस्ती करतांना दिसत आहे. फोटोमध्ये हिनाया सचिनचे गाल खेचतांना दिसत आहे.

सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह आयपीएलमधील मुंबई इंडियंसच्या एका जाहिरातीच्या शूटसाठी ते एकत्र आले होते. हरभजन त्याच्या मुलीसोबत तेथे पोहोचला होता.

हिनायाचा जन्म जुलै २०१६ मध्ये लंडनमध्ये झाला. यानंतर हरभजन आणि त्याची पत्नी गीता बसरा लंडनमध्येच होते. गीताचं कुटुंब हे लंडनमध्ये आहे. डिसेंबर २०१६ ला गीता मुलीसोबत भारतात आली होती.