मुंबई विरुद्ध हशीम अमलाची तुफान फटकेबाजी

Last Updated: Thursday, April 20, 2017 - 23:50
मुंबई विरुद्ध हशीम अमलाची तुफान फटकेबाजी

इंदूर : हशीम अमलानं सेंच्युरी मारल्यामुळे मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं धावांचा डोंगर उभारला आहे. अमलानं ६० बॉल्समध्ये १०४ रन्स केल्या. अमलाच्या या खेळीमध्ये ६ सिक्स आणि ८ फोरचा समावेश होता. अमलाच्या या सेंच्युरीमुळे पंजाबला २० ओव्हरमध्ये १९८ रन्सचा टप्पा गाठता आला. अमलाच्या या सेंच्युरीचा पंजाबला मात्र फारसा फायदा करून घेता आला नाही. मुंबईनं पंजाबचा आठ विकेट्स राखून पराभव केला. 

यंदाच्या आयपीएल मोसमातली ही दुसरी सेंच्युरी आहे. याआधी दिल्लीच्या संजू सॅमसननं पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली होती. अमलाला पंजाबचा कॅप्टन ग्लेन मॅक्सवेलनंही चांगली साथ दिली. मॅक्सवेलनं १८ बॉल्समध्ये ४० रन्सची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. मुंबईकडून मॅकलेनघननं सर्वाधिक दोन विकेट तर कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

पाहा अमलाची फटकेबाजी 

First Published: Thursday, April 20, 2017 - 23:37
comments powered by Disqus