त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरची ही आहे व्हॅलेंटाईन

Last Updated: Friday, February 17, 2017 - 10:13
त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरची ही आहे व्हॅलेंटाईन

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्हॅलेंटाईनबाबत आपले प्रेम जाहीर केल्यानंतर आणखी एका क्रिकेटपटूने सोशल मीडियाद्वारे आपले प्रेम जाहीर केलेय.

सेहवागनंतर त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरनेही आपल्या व्हॅलेंटाईनचा फोटो ट्विटरवर पोस्ट केलाय. मात्र त्याची व्हॅलेंटाईन दुसरी तिसरी कोणी नसून त्याची रेड कलरची फोर्ड मुस्तंग ही कार आहे.

या कारवरील नंबरप्लेटही स्पेशल आहे बरं का. 'KA 03 NA 303'. 
इंग्लंडविरुद्ध चेन्नई टेस्टमध्ये करुण नायरने नाबाद ३०३ धावांची खेळी साकारली होती. हाच आकडा त्याच्या नंबरप्लेटवर आहे. 

 

First Published: Friday, February 17, 2017 - 10:13
comments powered by Disqus