रोहित शर्माची आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली कामगिरी. 9 वर्षांमधलं सर्वोत्कृष्ट रँकिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज टीम इंडियानं गमावली असली तरी रोहित शर्मा मात्र आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. 

Updated: Jan 24, 2016, 10:48 PM IST
रोहित शर्माची आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली कामगिरी. 9 वर्षांमधलं सर्वोत्कृष्ट रँकिंग title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज टीम इंडियानं गमावली असली तरी रोहित शर्मा मात्र आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये 441 धावांचा डोंगर उभारल्यानं रोहित आता क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर आहे. आपल्या 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दितलं रोहितचं हे सगळ्यात उत्कृष्ट रँकिंग आहे. आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या या रँकिंगमध्ये विराट कोहली 2 नंबरवर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा एबीडी व्हिलिअर्स एक नंबरवर कायम आहे. 

टीम इंडियाच्या रँकिंगला धोका

तर टीमच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे. या यादीत टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका मात्र टीम इंडियाच्या फक्त एक पॉईंट मागे आहे. पण दक्षिण आफ्रिका आता इंग्लंडविरुद्ध 5 वनडेंची सीरिज खेळणार आहे. त्यामुळे धोनी ब्रिगेडचं दुसरं स्थान धोक्यात आलं आहे.