मला नाही वाटत माझी मुलगी मला ओळखते - धोनी

झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. 

Updated: Jun 16, 2016, 11:33 AM IST
मला नाही वाटत माझी मुलगी मला ओळखते - धोनी title=

हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. 

या मालिकेनंतर धोनीला मोठी रजा मिळतेय. धोनी आता थेट ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यात खेळणार आहे. यादरम्यानचा वेळ तो कुटुंबियांसोबत तसेच मुलगी झिवासोबत व्यतीत करणार आहे. 

हरारेत झालेल्या अखेरच्या सामन्यानंतर धोनीने आपण आपली रजा कुटुंबासोबत घालवणार तसेच झिवाला वेळ देणार असल्याचे सांगितले. यावेळी मस्करीत धोनीने मला नाही वाटत माझी मुलगी मला ओळखते असंही म्हटलं.