अर्जुन पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचं नाव बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे. ही शिफारस आपल्यासाठी गौरवपूर्ण असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.

Updated: Apr 27, 2015, 09:16 PM IST
अर्जुन पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचं नाव बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे. ही शिफारस आपल्यासाठी गौरवपूर्ण असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.

रोहित शर्मा यावर म्हणाला, "खूप आनंद होतोय, माझा गौरव झाल्यासारखं वाटतंय, कारण 'बीसीसीआय'ने माझ्या नावाची शिफारस केली आहे, काल हे मी ऐकलं तेव्हा मला खूप आनंद झाला."

'बीसीसीआय'ची काल कोलकात्यात कार्यसमितीची बैठक झाली, त्यात अर्जुन पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात रेकॉर्ड २६४ धावा केल्या,  वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक बनवण्याचा हा विक्रम एकट्या रोहित शर्माच्या नावावर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.