मला का अनुष्का आवडली, माहीत आहे का? : विराट कोहली

विराट कोहली जरी देशातील मोस्ट Desirable man ठरला असला तरी त्याच्या मते जगातील मोस्ट Desirable woman ही त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा आहे. त्यानं आता अनुष्का आपल्याला का आवडते हे रिविल केलय. याचबरोबर आपल्या आईबाबत तो अधिक सेनसिटीव्ह का आहे हेदेखील त्यानं सांगितलंय.

Updated: May 2, 2015, 04:18 PM IST
मला का अनुष्का आवडली, माहीत आहे का? : विराट कोहली title=

मुंबई : विराट कोहली जरी देशातील मोस्ट Desirable man ठरला असला तरी त्याच्या मते जगातील मोस्ट Desirable woman ही त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा आहे. त्यानं आता अनुष्का आपल्याला का आवडते हे रिविल केलय. याचबरोबर आपल्या आईबाबत तो अधिक सेनसिटीव्ह का आहे हेदेखील त्यानं सांगितलंय.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चित कपल आहे. या दोघांच्या लव्ह-अफेयरच्या चर्चा अगदी चवीनं चाखल्या जातात. आणि अनेकदा विराट या चर्चांना विषयही स्वत:हून पुरवत असतो. 

वर्ल्डकपदरम्यान आपली गर्ल फ्रेंड अनुष्काबाबत 'माय लव्ह' असं ट्विट करुन त्यानं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवानंतर अनुष्कावर केली जाणा-या टीकेमुळे रागावलेल्या विराटने थेट फॅन्सवरच हल्लाबोल केला होता. आता त्यानं आपल्याला अनुष्का का आवडते हे स्पष्ट केलय.

माझ्यासाठी माझी गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा ही जगातील मोस्ट Desirable woman आहे. ती खूप प्रेमळ आणि साधी व्यक्ती आहे. ती माझ्यासारखीच प्रामाणिक आहे. तिचा प्रामाणिकपणाच मला सर्वाधिक भावतो. तिचा हाच गुण मला तिच्याकडे अधिक आकर्षित करतो.

अनुष्काच्या प्रेमात विराट किती आकंठ बुडालेला आहे हे यावरुनच स्पष्ट होत. दरम्यान आपल्याला फॅन्सने मोस्ट Desirable man साठी का निवडलं असाव या प्रश्नावर कोहली म्हणतो की आईवर असलेलं आपलं प्रेम, अनुष्काशी असलेल्या रिलेशनचा आपण करत असलेला आदर, बॉय नेक्स्ट डोअर प्रतिमा आणि सेक्सी लूक ही कारण असावीत. 

कोहलीने आपण आईबाबत अधिक सेनसिटीव्ह का आहोत हेदेखील स्पष्ट केलय. २००६मध्ये आपले वडील वारले तेव्हा आपण नुकतच फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आपल्या आईने त्यावेळी धैर्याने कुटुंबाला एकत्र ठेवलं. कठीण समयी मी तिला परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळताना पाहिलं आहे. यामुळे आईप्रती असलेलं आपलं प्रेम आणि आदर दुणावल्याचं तो सांगतो. विराटच्या आयुष्यात आई आणि गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा या दोन आदरणीय महिला आहेत आणि विराट या दोघींबाबतही तेवढाच सेनसिटीव्ह आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.