'वन डे' क्रिकेटचं रुप पालटलं; नियमांत बदल

'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (ICC) बारबडोसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत एक दिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केलेत.  एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील 'आयसीसी' कमिटीनं या प्रस्तावांना मंजुरी दिलीय.  

Updated: Jun 27, 2015, 03:11 PM IST
'वन डे' क्रिकेटचं रुप पालटलं; नियमांत बदल  title=

नवी दिल्ली : 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (ICC) बारबडोसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत एक दिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केलेत.  एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील 'आयसीसी' कमिटीनं या प्रस्तावांना मंजुरी दिलीय.  

या परिषदेत 'वन डे' क्रिकेटमध्ये चार महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेत. हे नवीन नियम ५ जूलैपासून लागू होतील.

काय असतील हे बदल पाहुयात.. 

* १५-४० ओवर दरम्यान असणारा 'पॅावर प्ले' यापुढे बंद होणार

* पहिल्या १० ओव्हर्समध्ये 'कॅचिंग फिल्डर' लावणं यापुडे बंधनकारक असणार नाही. 

* ४१-५० ओव्हर्सपर्यंत ३० यार्डाच्या बाहेर ५ खेळाडू उभे केले जाऊ शकतात. 

* प्रत्येक 'नो बॅाल'वर 'फ्री हिट' मिळणार... यापूर्वी फक्त 'ओव्हर स्टेपिंग नो बॅाल'वरचं फ्री हिट मिळायची.

या नवीन बदलांचा फायदा बॅटिंग आणि बॅालिंग अशा दोन्ही गोष्टींसाठी होईल, असं म्हटलं जातंय. आयसीसीचे कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वर्ल्डकप नंतर वन डे  नियमांचं परिक्षण करण्यात आलं होतं.  नियमांत बदलाची फार काही आवश्यकता नव्हती. पण, वन डे क्रिकेट प्रेक्षकांच्या दृष्टीनं अधिक सोपं बनवायचं होतं. त्यामुळे हे बदल करण्यात आले. 

  
अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीने या सुधारित नियमांची शिफारस केली होती. गेल्या काही वर्षात लागू केलेल्या नवीन नियमांमुळे वन डे क्रिकेटमध्ये बॅटसमन अधिक भाव खाऊन जात होते. त्यामुळे,  नियमांत बदल होण्याची गरज व्यक्त केली जात होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.