केदारच्या झुंजार खेळीनंतरही भारताचा पराभव

केदार जाधवनं 75 बॉलमध्ये केलेल्या 90 रनच्या झुंजार खेळीनंतरही भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Updated: Jan 22, 2017, 09:52 PM IST
केदारच्या झुंजार खेळीनंतरही भारताचा पराभव  title=

कोलकाता : केदार जाधवनं 75 बॉलमध्ये केलेल्या 90 रनच्या झुंजार खेळीनंतरही भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 322 रनचा पाठलाग करताना 50 ओव्हरमध्ये भारताला 316 रनपर्यंत मजल मारता आली.

पहिल्या दोन्ही मॅचप्रमाणे या मॅचमध्येही भारताला ओपनरनी चांगली सुरुवात करून दिली नाही. पहिले अजिंक्य रहाणे एक रनवर तर राहुल 11 रनवर आऊट झाला. यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि युवराज सिंगनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला.

कोहलीनं या मॅचमध्ये 55 तर युवराजनं 45 रन केल्या, पण दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. धोनीनंही 25 रन केल्यानंतर आऊट झाला. यानंतर हार्दिक पांड्या आणि केदार जाधवनं धमाकेदार खेळी केली. हार्दिक पांड्यानं 43 बॉलमध्ये 56 रन करून केदार जाधवला तोडीसतोड साथ दिली.

तिसरी वनडे भारतानं गमावली असली तरी सीरिज मात्र 2-1नं जिंकली आहे. यानंतर आता भारत थेट जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवेळीच वनडे खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी भारतीय ओपनरचा खराब फॉर्म हा मात्र कोहली आणि निवड समितीसाठी चिंतेचा विषय असणार आहे.