तीन महिन्यात दोनवेळा भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

टी-२० वर्ल्डकपपूर्वी बांगलादेशात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक आलेय. या स्पर्धेची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होतेय आणि अंतिम सामना ६ मार्चला खेळवण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारीला मिरपूरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही देशांदरम्यान अखेरचा सामना गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळवला गेला होता. 

Updated: Jan 28, 2016, 11:43 AM IST
तीन महिन्यात दोनवेळा भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार title=

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपपूर्वी बांगलादेशात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक आलेय. या स्पर्धेची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होतेय आणि अंतिम सामना ६ मार्चला खेळवण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारीला मिरपूरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही देशांदरम्यान अखेरचा सामना गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळवला गेला होता. 

टी-२० वर्ल्डकपमध्ये भिडणार दोन्ही देश
वर्ल्ड कप टी-२० मध्ये दोन्ही देशांदरम्यान १९ मार्च रोजी धर्मशाला येथे सामना होणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धा ८ मार्चला सुरु होत असून अंतिम सामना ३ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. 

आशिया चषकाचे वेळापत्रक
२४ फेब्रुवारी - भारत वि बांग्लादेश
२६ फेब्रुवारी  - बांगलादेश वि टीबीडी
२७ फेब्रुवारी - भारत वि पाकिस्तान
२८ फेब्रुवारी - बांगलादेश वि श्रीलंका
२९ फेब्रुवारी - पाकिस्तान वि टीबीडी
१ मार्च - भारत वि श्रीलंका
२ मार्च - बांगलादेश वि पाकिस्तान
३ मार्च - भारत वि टीबीडी
४ मार्च - पाकिस्तान वि श्रीलंका
६ मार्च - अंतिम सामना