सेमीफायनलमध्ये भारतच जिंकणार, चाणक्य माशाची भविष्यवाणी

 फूटबॉलमध्ये भविष्यवाणी करणारा बाबा ऑक्टोपस तुम्हांला आठवतो का? तशी भविष्यवाणी आता क्रिकेटसाठी एका माशाने केली आहे. या भविष्यवाणीनुसार भारतच सेमी फायनल जिंकणार असून फायनलमध्ये न्यूझीलंडशी धडक मारणार आहे. चेन्नईमधील चाणक्य नावाच्या एका माशाने भारताच्या विजयाच्या बाजूने आपला कौल दिला आहे.

Updated: Mar 26, 2015, 01:43 PM IST
सेमीफायनलमध्ये भारतच जिंकणार, चाणक्य माशाची भविष्यवाणी title=

चेन्नई :  फूटबॉलमध्ये भविष्यवाणी करणारा बाबा ऑक्टोपस तुम्हांला आठवतो का? तशी भविष्यवाणी आता क्रिकेटसाठी एका माशाने केली आहे. या भविष्यवाणीनुसार भारतच सेमी फायनल जिंकणार असून फायनलमध्ये न्यूझीलंडशी धडक मारणार आहे. चेन्नईमधील चाणक्य नावाच्या एका माशाने भारताच्या विजयाच्या बाजूने आपला कौल दिला आहे.
 
चाणक्य नावाच्या या माशाने भारताच्या बाजूने आपला कौल दिल्याने अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
 
फिश टँकमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे झेंडे पाण्यात सोडण्यात आले आणि या चाणक्य माशाने भारतीय झेंड्याला नाक घासत आपला कौल दिला. त्यामुळे आता चाणक्यची भविष्यवाणी खरी ठरावी हीच प्रत्येकाची इच्छा आहे.
 
याआधी चाणक्य माशाने केलेली भविष्यवाणी जवळपास खरे ठरले होते. या माशाने वर्ल्ड कपमधील क्वार्टर फायनलमधील सामन्याचं वर्तवलेलं भाकित अगदी खरं ठरलं होतं. इतकंच नाही तर सेमीफायनल मधील न्यूजीलंड आणि दक्षिण आफ्रिका सामन्याची भविष्यवाणी तंतोतंत ठरली होती. त्यामुळे आता चाणक्य माशाने भारताबाबत वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरणार की खोटी हे आता काही तासांत स्पष्ट होईल.

पाहा व्हिडिओ

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.