टीम इंडियाची इंग्लंडवर 133 रन्सनं मात, सीरिजमध्ये आघाडी

भारत विरुद्द इंग्लंड दुसऱ्या वन डे मॅचमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतानं इंग्लंडवर 133 रन्सनं मात केलीय.

Updated: Aug 27, 2014, 11:19 PM IST
टीम इंडियाची इंग्लंडवर 133 रन्सनं मात, सीरिजमध्ये आघाडी

मुंबई : भारत विरुद्द इंग्लंड दुसऱ्या वन डे मॅचमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतानं इंग्लंडवर 133 रन्सनं मात केलीय.

सुरेश रैनाच्या आक्रमक शतकानं टीम इंडियाला ‘टॉनिक’च मिळालेलं दिसलं. याच जोरावर भारतानं बुधवारी टेस्ट सीरिजचं अवघड जागेचं दुखणं विसरून रवींद्र जडेजाच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आणि आकर्षक बॉलिंगचं एक उदाहरणच दाखवून दिलं. 

रोहित शर्मा (52), अजिंक्य राहणे (41) यांनी भारताला सुरुवातीच्या धक्क्यांपासून सावरलं. त्यानंतर आलेल्या रैनानं 75 बॉल्सवर 12 फोर आणि तीन सिक्स ठोकत 100 रन्स पूर्ण केले. रैनाचं, गेल्या साडे चार वर्षांतलं पहिलं आणि वन डे मॅचमध्ये हे चौथं शतक आहे. त्यानं कॅप्टन महेंद्रसिंग धोनी (52) सोबत पाचव्या विकेटसाठी 144 रन्सची भागीदारी नोंदवली. ज्यामुळे भारताला सहा विकेट गमावत 304 रन्स बनवता आले. उल्लेखनीय म्हणजे यातील 133 रन्स शेवटच्या 13 ओव्हर्समध्ये बनले. 

इंग्लंडची बॅटींग सुरु होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे, इंग्लंडला 47 ओव्हर्समध्ये 295 रन्सचं टार्गेट मिळाले. परंतु, भारताच्या आक्रमक आणि स्पिन मिश्रित आक्रमणासमोर इंग्लंडच्या बॅटसमननी सरळ सरळ गुढघे टेकलं. इंग्लंडच्या संपूर्ण टीमला 38.1 ओव्हर्समध्ये अवघे 161 रन्स बनवता आले. आपल्या करिअरमधली पहिलीच वन डे मॅच खेळणाऱ्या एलेक्स हेल्सनं सर्वाधिक 40 रन्स बनवले. 

या दोन्ही टीममधली पहिली वन डे मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली होती. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत भारतानं पाच मॅचच्या सीरिजमध्ये आघाडी घेतलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.