विराट नेतृत्वाची आज परीक्षा

महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे आज होतेय.

Updated: Jan 15, 2017, 08:29 AM IST
विराट नेतृत्वाची आज परीक्षा title=

पुणे : महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे आज होतेय.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वनडेतही विजयी मालिका कायम राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीये. टीम इंडियाच्या संघात अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, मनीष पांडे, केदार जाधव, विराट कोहली हे फलंदाज असल्याने स्टेडियमवर धावांचा पाऊसच पडेल.

कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर विजयाची हीच गती कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल तर दुसरीकडे पराभवाची मालिका संपवण्याचे आव्हान इंग्लंड संघासमोर असेल.

कसोटी मालिकेतील विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलाय. या वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पहिल्या सामन्यात विजय साकारण्याच्या दृष्टीने टीम इंडिया मैदानात उतरेल. 

सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता.