धोनीसह द्रविडची आजपासून पहिली 'टेस्ट'!

Last Updated: Wednesday, July 9, 2014 - 15:21
धोनीसह द्रविडची आजपासून पहिली 'टेस्ट'!

लंडन: भारतच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरुवात होतेय. पहिली टेस्ट ट्रेंटब्रिजमध्ये रंगणार आहे. 2011 च्या दौऱ्यात भारताला 4-0 नं सपाटून मार खावा लागला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असणार आहे. 

धोनीच्या नेतृत्वाची कसोटी या मॅचमध्ये लागणार आहे. त्याचप्रमाणे बॉलर्सची अग्निपरीक्षा या दौऱ्यात असणार आहे. विराट कोहलीवर टीम इंडियाच्या बॅटिंगची भिस्त असेल. चेतेश्वर पुजारा या युवा बॅट्समनकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय टीम मॅनेजमेंटला असेल. 

त्याचप्रमाणे राहुल द्रविड भारतीय बॅटिंगच्या सल्लागाराची भूमिका बजावतोय. आता ट्रेंटब्रिज टेमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडेच सांऱ्यांचंच लक्ष असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

PTI

First Published: Wednesday, July 9, 2014 - 13:06


comments powered by Disqus
Live Streaming of Lalbaugcha Raja