पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व

 इंग्लंडच्या कर्णधार कूकचं शतक 5 धावांनी हुकलं. तर गॅरी बॅलन्सने मालिकेतील दुसरं शतक साजरं केलं. 

Updated: Jul 27, 2014, 11:27 PM IST
पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व title=

साऊदम्पटन :  इंग्लंडच्या कर्णधार कूकचं शतक 5 धावांनी हुकलं. तर गॅरी बॅलन्सने मालिकेतील दुसरं शतक साजरं केलं. 

गॅरी बॅलन्सने 189 चेंडूत शतक पूर्ण केलं. मात्र कूकला जाडेजाने 95 धावांवर माघारी धाडल्याने, तो शतकी खेळी करू शकला नाही.
 
अॅलेस्टर कूक आणि गॅरी बॅलन्सच्या दमदार फलंदाजीमुळे कसोटीच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडनेच वर्चस्व गाजवलं आहे. या जोडीमुळे इंग्लंडने 2 बाद 250 धावांचा टप्पा गाठला होता.
 
कूकच्याआधी भारताला सॅम रॉबसनच्या रुपाने पहिली विकेट मिळाली. मोहम्मद शमीनं पहिल्या सत्रात सॅम रॉबसनला माघारी धाडलं. मात्र कूक आणि रॉबसन या दोन विकेट्स वगळता भारताची गोलंदाजी निष्प्रभ ठरताना दिसत होती.
 
याचा फायदा इंग्लडला झाला, चहापानापर्यंत इंग्लंडने 1 बाद 186 धावांवर मजल मारली होती. त्यानंतरही कूक आणि बॅलन्सने दमदार फलंदाजी केली. मात्र जाडेजाने कूकला बाद करत अखेर ही जोडी वेगळी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.