मोहाली कसोटीत टीम इंडियाचा शानदार विजय

मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियाचा शानदार विजय झाला. १०८ रन्सनं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा टीम इंडियाने उडविला. भारतीय स्पिनर्सपुढं आफ्रिकन बॅट्समन्सची सपशेल शरणागती पत्करली. 

Updated: Nov 7, 2015, 04:39 PM IST
मोहाली कसोटीत टीम इंडियाचा शानदार विजय title=

मोहाली : मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियाचा शानदार विजय झाला. १०८ रन्सनं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा टीम इंडियाने उडविला. भारतीय स्पिनर्सपुढं आफ्रिकन बॅट्समन्सची सपशेल शरणागती पत्करली. 

मोहालीत टीम इंडियानं दिवाळी आधीची विजयी दिवाळी साजरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय टीमनं १०८ रन्सनं बाजी मारली. भारतानं आफ्रिकन टीमसमोर २१८ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना आफ्रिकन टीम १०९ रन्सवरच ऑल आऊट झाली. 

रवींद्र जाडेचानं दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वाधिक ५ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. टीम इंडियानं आपल्या स्पिन बॉलर्सच्या जोरावर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी विजय साकारला. या विजयासह भारतानं टेस्ट सीरिजमध्ये १-० ने आघाडी घेतली. त्याचप्रमाणे कोहलीच्या नेतृत्वाखालील हा भारताचा सलग तिसरा टेस्ट विजय ठरलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.