'अजिंक्य'च्या सेंच्युरीनं टीम इंडियानं गाठलं यशाचं 'शिखर'

मुंबईचा अजिंक्य रहाणेची पहिली वनडे सेंच्युरी आणि शिखर धवनच्या ९७ रन्सच्या विस्फोटक खेळीनं टीम इंडियानं इंग्लंडला ९ विकेटनं हरवलंय. या विजयासह टीम इंडियानं ३-० असा सीरिजवरही कब्जा मिळवलाय. 

Updated: Sep 2, 2014, 10:10 PM IST
'अजिंक्य'च्या सेंच्युरीनं टीम इंडियानं गाठलं यशाचं 'शिखर' title=

बर्निंगहॅम: मुंबईचा अजिंक्य रहाणेची पहिली वनडे सेंच्युरी आणि शिखर धवनच्या ९७ रन्सच्या विस्फोटक खेळीनं टीम इंडियानं इंग्लंडला ९ विकेटनं हरवलंय. या विजयासह टीम इंडियानं ३-० असा सीरिजवरही कब्जा मिळवलाय. 

याआधी बॉलर्सनंही जबरदस्त परफॉर्मन्स देत २०६ रन्सवर इंग्लंडला ऑलआऊट केलं. नाणेफेक जिंकत भारतानं  बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या बॅट्समनचा भारतीय बॉलर्ससमोर फारकाळ टिकावधरता आला नाही. दमदार १०६ रन्स करणारा अजिंक्य रहाणे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
 
भारताचा बॉलर मोहम्मद शामी यानं २८ रन्स देत गॅरी बॅलेन्स, जोस बटलर आणि हॅरी गर्नि यांना आऊट केलं. तर अ‍ॅलिस्टर कुकच्या जेमतेम नऊ रन्स झाल्या असताना भुवनेश्वर कुमारच्या बॉलवर सुरेश रैनाकडे कॅच गेल्यानं त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. 

तसंच रविंद्र जडेजानं ४० रन्स देत इयान मुरगन आणि स्टिव्हन फिनला आऊट केलं. मोईन अलीचा अपवाद वगळता इंग्लंडच्या संघातील महत्वाच्या फलंदाजांना अर्धशतकही करता आलं नाही. मोईन अलीनं ६७ रन्स केल्या तर जो रुट अर्धशतकाच्या जवळ असतानाच धवल कुलकर्णिकडे कॅच गेल्यानं तो आऊट झाला. सोशल नेटवर्कसाइट्सवर भरतीय संघ कसोटी सामन्याचा बदला घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.