बॅटवर स्टीकर लावण्यासाठी खेळाडू घेतात किती पैसे

भारतीय क्रिकेट खेळाडू हे जगातील सगळ्यात चर्चित व्यक्तींमधील एक आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंना अधिक लोकप्रियता मिळत असल्याने त्यांच्यावर जाहीरात कंपन्यांचं देखील अधिक लक्ष असतं. बॅटवर स्टिकर लावण्यासाठी अनेक कंपन्या यांना पैसा देतात.

Updated: Jun 17, 2016, 07:58 PM IST
बॅटवर स्टीकर लावण्यासाठी खेळाडू घेतात किती पैसे title=

मुंबई : भारतीय क्रिकेट खेळाडू हे जगातील सगळ्यात चर्चित व्यक्तींमधील एक आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंना अधिक लोकप्रियता मिळत असल्याने त्यांच्यावर जाहीरात कंपन्यांचं देखील अधिक लक्ष असतं. बॅटवर स्टिकर लावण्यासाठी अनेक कंपन्या यांना पैसा देतात.

पाहा कोणता खेळाडू घेतो किती पैसे

१. युवराज सिंग : टीम इंडियांचा धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग त्याच्या बॅटवर PUMA चं स्टीकर लावतो. त्यासाठी जो ४ कोटी रुपये घेतो. शिवाय तो PUME चं रिस्टबँड आणि बुटं देखील वापरतो.

२. रोहित शर्मा : भारतीय टीमचा ओपनर रोहित शर्माने नोव्हेंबर 2015 मध्ये CEAT कंपनीसोबत साईन केलं होतं. रोहित त्याच्या बॅटवर CEAT चं स्टीकर लावतो. त्यासाठी तो ३ कोटी रुपये घेतो.

३. शिखर धवन : भारतीय टीमचा आणखी एक ओपनर शिखर धवन त्याच्या बॅटवर एमआरएफ कंपनीचं स्टीकर लावतो यासाठी कंपनी त्याला ३ कोटी रुपये मोजते.

४. सुरेश रैना : भारताचा आणखी एक स्टार खेळाडू सुरेश रैनाने ऑक्टोबर २०१५ मध्ये CEAT कंपनीसोबत ३ वर्षाचा करार केला आहे. रैना देखील त्याच्या बॅटवर CEATचं स्टीकर लावतो. त्यासाठी तो २.५ कोटी रुपये घेतो.