१५ वर्षानंतर भारताने जिंकला हॉकी ज्यूनिअर वर्ल्डकप

भारताने १५ वर्षानंतर ज्यूनिअर हॉकी वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये जवळपास १०००० दर्शकांच्या उपस्थितीत आज भारताने बेल्जियमवर २-१ ने मात केली. 

Updated: Dec 18, 2016, 07:49 PM IST
१५ वर्षानंतर भारताने जिंकला हॉकी ज्यूनिअर वर्ल्डकप title=

लखनऊ : भारताने १५ वर्षानंतर ज्यूनिअर हॉकी वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये जवळपास १०००० दर्शकांच्या उपस्थितीत आज भारताने बेल्जियमवर २-१ ने मात केली. 

भारताने २ तर बेल्जियअने एक गोल केला. भारताकडून पहिला गोल गुरजत सिंहने तर दुसरा गोल स्‍ट्राइकर सिमरनजीत सिंहने केला. विजयाच्या रथावर असणाऱ्या भारतीय हॉकी संघाने १५ वर्षानंतर हॉकी वर्ल्डकप जिंकला. याआधी 2001 मध्ये ऑस्ट्रेलियातील होबर्टमध्ये भारतीय टीमने अर्जेंटीना 6-1 ने हरवलं होतं आणि वर्ल्डकप जिंकला होता.

हरमनप्रीतला फॅन्स चॉईस पुरस्कार

भारतीय टीमचा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंहला भारत आणि बेल्जियममधल्या फायनल मॅचआधी फँस चॉईस प्लेयर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. तर न्यूजीलंड टीमला फेयरप्ले पुरस्कार मिळाला. हरमनप्रीतने विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

मुख्यमंत्री आणि राज्यपालांची उपस्थिती

भारत आणि बेल्जियममधला हा सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राज्यपाल राम नाईक देखील उपस्थित होते. अखिलेश कुमार हे मॅच सुरू होण्याआधीच पोहोचले आणि राष्ट्रगीताआधी दोन्ही संघांना भेटले.

ज्यूनियर हॉकी वर्ल्डकप पाहण्यासाठी तुफान प्रतिसाद लाभला. स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येने लोकं येथे उपस्थित होते. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला.