आज मुंबई वि पुणेरी लढत

आज आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामना रंगतोय. महाराष्ट्र डर्बीचा थरार आज बंगळूरुच्या मैदानात पाहायला मिळणार आहे.

Updated: May 21, 2017, 04:08 PM IST
आज मुंबई वि पुणेरी लढत title=

बंगळूरु : आज आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामना रंगतोय. महाराष्ट्र डर्बीचा थरार आज बंगळूरुच्या मैदानात पाहायला मिळणार आहे.

आयपीएलच्या या हंगामात पुणे आणि मुंबई यांच्यात रंगलेल्या आतापर्यंतच्या तीन सामन्यात पुण्याने मुंबईला हरवलेय. त्यामुळे या चौथ्या सामन्यात काय होणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागून राहिलीये. 

एकीकडे सातत्यपूर्ण खेळ करत असलेल्या रोहितच्या मुंबईचे पारडे जड असले तरी पुण्याला कमी लेखून चालणार नाही. कारण इतर संघांविरुद्ध मुंबईची कामगिरी चांगली झाली असली तरी पुण्याविरुद्धचा या आयपीएलमधील इतिहास विसरुन चालणार नाही. त्यामुळे पुण्याविरुद्धचा हा सामना सहज घेऊन चालणार नाही.

सामन्याची वेळ - रात्री ८ वाजता.