घरच्या मैदानात मुंबईचा दारूण पराभव, चेन्नई ६ विकेट राखून विजयी

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भोपळा फुटला नाहीय. मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 6 विकेटनं पराभव झालाय. यासोबतच सलग मुंबईचा हा चौथा पराभव आहे. 

Updated: Apr 18, 2015, 12:05 AM IST
घरच्या मैदानात मुंबईचा दारूण पराभव, चेन्नई ६ विकेट राखून विजयी title=

मुंबई: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भोपळा फुटला नाहीय. मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 6 विकेटनं पराभव झालाय. यासोबतच सलग मुंबईचा हा चौथा पराभव आहे. 

रोहित शर्माच्या टीमला यंदाच्या सिझनमध्ये सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडेवर चेन्नई सुपर किंग्सनी मुंबईला हरवून सिझनमधील विजयाची हॅटट्रिक केलीय. या मॅचमध्ये मुंबईनं ठेवलेलं 184 रन्सचं टार्गेट चेन्नईनं आरामात पूर्ण केलं.
 
सुरुवातीला मुंबई इंडियन्सनं या सामन्यात २० षटकात सात बाद १८३ धावा केल्या. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवातीला खराब कामगिरी झाली. मात्र कप्तान रोहित शर्मा आणि केरॉन पोलार्ड यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न करत सर्वाधिक धावा केल्या. 

उत्तरात सुपर किंग्ससाठी ड्वेन स्मिथ आणि ब्रेण्डन मॅक्युलमनं 7 ओव्हर आणि 2 बॉल्समध्ये 109 धावांची स्फोटक सलामी दिली. स्मिथनं 62 तर मॅक्युलमनं 46 धावा करून चेन्नईच्या विजयाचा पाया घातला. त्याआधी चेन्नईचा गोलंदाज आशिष नेहरानं तीन विकेट्स काढल्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.