बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत  १५८ रन केले.

Updated: May 24, 2016, 11:40 PM IST

बंगळुरु : आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत  १५८ रन केले.

मॅचमध्ये दोघांचीही सुरुवात खराब झाली पण नंतर दोन्ही टीमच्या खेळाडूंनी डाव सांभाळला आणि या मोठ्या मॅचमध्ये डिविलियर्सच्या तुफानी खेळीमुळे आरसीबीला फायनलचं तिकीट मिळालं.

आरसीबीने २९ रन्सवर ५ विकेट गमावले होते त्यामुळे गुजरात लायन्स जिंकणार हे जवळपास अनेकांना वाटतं होतं पण डिविलियर्सने सावध खेळी करत नंतर चांगलंच धुतलं आणि ४५ बॉलमध्ये ७७ रन करत विजय खेचून आणला.