आयपीएलसाठी पुणे आणि राजकोट नव्या संघांची घोषणा

Updated: Dec 8, 2015, 02:29 PM IST
आयपीएलसाठी पुणे आणि राजकोट नव्या संघांची घोषणा title=

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगसाठी दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आलीय. पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ आयपीएलमध्ये खेळणार आहेत. संजीव गोएंकाच्या न्यू रायझिंग कंपनीकडे पुण्याची फ्रँचायझी देण्यात आलीय तर इंटेक्सने राजकोटची फ्रँचायझी घेतलीय.

ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, इंटेक्स ग्रुपने १० कोटी रुपयांना राजकोट संघाला विकत घेतलेय. तर संजीव गोएंका यांनी पुण्याच्या संघाला विकत घेतलेय. गोएंका इंडियन सुपर लीगमध्ये कोलकाता फ्रँचायझीचेही सहमालक आहेत. 

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी न्यायमूर्ती लोढा समितीने केलेल्या शिफारसीनुसार चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थॉन रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आलीय. या संघाऐवजी पुणे आणि राजकोट संघ आयपीएलमध्ये खेळणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.