खूशखबर: ३०० रुपयांत मिळवा आयपीएलच्या फायनलचं तिकिट

इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने एक गिफ्ट दिलं आहे. आयपीएल- ८ च्या क्वालिफायर आणि फायनल सामन्यांच्या तिकिटाची किमान किंमत ३०० रुपये करण्यात आली आहे. 

Updated: May 14, 2015, 06:09 PM IST
खूशखबर: ३०० रुपयांत मिळवा आयपीएलच्या फायनलचं तिकिट title=

नवी दिल्ली : इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने एक गिफ्ट दिलं आहे. आयपीएल- ८ च्या क्वालिफायर आणि फायनल सामन्यांच्या तिकिटाची किमान किंमत ३०० रुपये करण्यात आली आहे. 

बीसीसीआयने सांगितलं की, आयपीएलची ऑफिशिअल वेबसाईटवर तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. या तिकिटांची किमान किंमत ३०० रुपये ठेवण्यात आली आहे.

दुसरा क्वालिफायर सामना २२ मे रोजी रांचीच्या 'जेएससीए इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'मध्ये खेळला जाणार आहे. अंतिम सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर २४ मे रोजी खेळविला जाणार आहे.

तसेच तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठीचा २० मेला पुण्यात होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांची विक्री शुक्रवार पासून डेक्कन जिमखान्यात सुरु झाली आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.