आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलचा चेहरा बदलणार: सचिन तेंडुलकर

  इंडियन सुपर लीग सुरू झाल्यामुळे भारतीय फुटबॉलचा चेहरा बदलणार आहे, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे.

Updated: Oct 21, 2014, 08:39 PM IST
आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलचा चेहरा बदलणार:  सचिन तेंडुलकर title=

गुवाहाटी :  इंडियन सुपर लीग सुरू झाल्यामुळे भारतीय फुटबॉलचा चेहरा बदलणार आहे, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे.
 

केरल ब्लास्टर्स एफसीचा सचिन हा आयएसएलमध्ये फ्रेंचायझी मालक आहे. इंग्लंडचा माजी गोलकीपर डेविड जेम्स हा त्याच्या टीमचा कॅप्टन आहे. 
 

तेंडुलकरच्या केरळ ब्लास्टर्स टीमने चांगले प्रदर्शन केले आहे. लीगमुळे फुटबॉलला नवीन रूप प्राप्त होणार आहे. भारतीय फुटबॉलसाठी हा सुवर्णक्षण आहे. या क्षणाचा मी हिस्सा असल्याचा मला अभिमान वाटत आहे. या फुटबॉल लीगला सर्व देशाचा पाठिंबा मिळायला हवा असे सचिनने म्हटलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.