जोगिंदर शर्माने ९ वर्षानंतर सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गुपीत

पहिला टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला होता आणि ते ही पाकिस्तानचा पराभव करुन. ही गोष्ट आजही प्रत्येकाच्या आठवणीत असेल. मॅचची शेवटची ओव्हर ही निर्णायक होती आणि धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात बॉल सोपवला.

Updated: Mar 12, 2016, 02:46 PM IST
जोगिंदर शर्माने ९ वर्षानंतर सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गुपीत title=

मुंबई : पहिला टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला होता आणि ते ही पाकिस्तानचा पराभव करुन. ही गोष्ट आजही प्रत्येकाच्या आठवणीत असेल. मॅचची शेवटची ओव्हर ही निर्णायक होती आणि धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात बॉल सोपवला.

महेंद्र सिंग धोनी शेवटची ओव्हर कोणाला द्यायची या संकटात होता पण तुम्हाला माहित नसेल की शेवटची ओव्हर ही स्वत: जोगिंदर शर्माने मागून घेतली होती. अशा प्रेशरच्या वेळेत बॉलिंग मागणं या पेक्षा आत्मविश्वास अजून काय असू शकतो.

जोगिंदर शर्माने देखील निराश नाही केलं त्याने मिस्बाहला आऊट केलं आणि भारताने पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला. ऑफ स्टंपला बॉल टाकण्याचा प्लॅन ठरला. पहिला बॉल व्हाईट गेला पण त्यामुळे जोगिंदर खूश झाला त्याला कळून चुकलं की बॉल हा स्विंग झाला.

दुसऱ्या बॉलमध्ये सिक्स लागला पण त्याच्या पुढच्याच बॉलला मिस्बाह मागे मारण्याच्या प्रयत्नात कॅच देऊन बसला. जोगिंदर म्हणतो की कॅप्टनचा आमच्यावर कोणताही दबाव नव्हता. पण पाकिस्तानच्या खेळाडूंवर १० पट अधिक दबाव होता.