मुंबईच्या विजयानंतर जॉस बटलरचा न्यूड डान्स

आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या मेगा फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा एक रननं पराभव केला.

Updated: May 22, 2017, 08:17 PM IST
मुंबईच्या विजयानंतर जॉस बटलरचा न्यूड डान्स  title=

हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या मेगा फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा एक रननं पराभव केला. अत्यंत रोमहर्षक अशा या मॅचचा निकाल शेवटच्या बॉलवर लागला.

या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा सहकारी खेळाडू जॉस बटलरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुंबईच्या विजयानंतर बटलरनं चक्क न्यूड डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ बटलरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मुंबईला सुरुवातीच्या मॅचमध्ये विजय मिळवून देताना बटलरचं मोलाचं योगदान होतं. पण इंग्लंडच्या मॅच सुरु होत असल्यामुळे त्याला आयपीएलमध्येच सोडून जावं लागलं. बटलरच्याऐवजी मग मुंबईच्या टीममध्ये वेस्ट इंडिजच्या लेंडल सिमन्सला संधी देण्यात आली.

पाहा बटलरचा न्यूड डान्स

 

The winning moment!!!

A post shared by Jos Buttler (@josbuttler) on