केदार जाधव आहे दबंग खानचा मोठा फॅन

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात होमग्राऊंडवर केवळ ७६ चेंडूत १२० धावा करुन विजयाचा मार्ग सुकर करणाऱा केदार सध्या टीम इंडियाचा नवा सुपरमॅन झालाय. 

Updated: Jan 18, 2017, 08:03 AM IST
केदार जाधव आहे दबंग खानचा मोठा फॅन title=

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात होमग्राऊंडवर केवळ ७६ चेंडूत १२० धावा करुन विजयाचा मार्ग सुकर करणाऱा केदार सध्या टीम इंडियाचा नवा सुपरमॅन झालाय. 

ज्या केदारचे भारतीय चाहते फॅन झालेत तो केदार कोणाचा फॅन आहे तुम्हाला माहीत आहे का? केदार बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानचा मोठा चाहता आहे. सलमानच्या स्टाईलही तो कॉपी करतोय.

केदारच्या बहिणीने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती सांगितली. केदारचे सध्या मोठे चाहते झालेत मात्र तो स्वत: सलमानचा मोठा चाहता आहे. केदारने सलमानचे सर्व सिनेमे पाहिलेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी केदार सलमानच्या प्रत्येक सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला हजेरी लावत असे. 

केदारजवळ सलमानच्या सिनेमांचे मोठे कलेक्शन आहे आणि जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा तो हे सिनेमे पाहतो. तसेच त्याच्या मोबाईलमध्येही जितकी बॉलीवूडची गाणी आहेत त्यात सर्वाधिक गाणी सलमानच्या सिनेमातील आहेत.