चायना ओपन : सायनानंतर श्रीकांतलाही जेतेपद

 सायना नेहवालपाठोपाठ भारताच्या श्रीकांत किदांबीनेही चायना ओपनच्या पुरुष एकेरीचं जेतेपद मिळवलं आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूंनी चीनमधील चायना ओपनमध्ये तिरंगा फडकावला आहे.

Updated: Nov 16, 2014, 07:21 PM IST
चायना ओपन : सायनानंतर श्रीकांतलाही जेतेपद title=

बीजिंग :  सायना नेहवालपाठोपाठ भारताच्या श्रीकांत किदांबीनेही चायना ओपनच्या पुरुष एकेरीचं जेतेपद मिळवलं आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूंनी चीनमधील चायना ओपनमध्ये तिरंगा फडकावला आहे.
 
श्रीकांतने हा सामना  21-19, 21-17 असा जिंकला आहे. श्रीकांत किदांबीचं कारकीर्दीतील हे पहिलंच सुपर सीरीज जेतेपद आहे. स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीकांत किदांबीने चीनचा ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन लिन डॅनवर सनसनाटी विजय मिळवला. 
 
श्रीकांत आधी 'फुल'राणी सायनाने चायना ओपनच्या महिला एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरलं. सायनाने हा सामना केवळ 42 मिनिटांत जिंकला होता. सायनाने पहिल्यादाच या स्पर्धेचं जेतेपद मिळवलंय. 

चायना ओपन जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलीय, सायनाने स्पर्धेच्या फायनलमध्ये जपानच्या अकाने यामागुचीवर 21-12, 22-20 असा विजय पटकावला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.