किंग्स इलेव्हन पंजाबकडून IPL-8 ची तिकिट विक्री सुरू

किंग्स इलेव्हन पंजाबने ८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रिमियर लीगच्या तिकिटांच्या विक्रीला सुरूवात केली आहे.

Updated: Mar 30, 2015, 04:54 PM IST
किंग्स इलेव्हन पंजाबकडून IPL-8 ची तिकिट विक्री सुरू title=

मुंबई : किंग्स इलेव्हन पंजाबने ८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रिमियर लीगच्या तिकिटांच्या विक्रीला सुरूवात केली आहे.

पुण्यात होणाऱ्या तीन मॅचची तिकिट विक्री सुरु करण्यात आली आहे. सर्वात स्वस्त तिकीट ५०० रुपये आणि सर्व सुखसोई असणाऱ्या सीटची किमान किंमत 3500 रुपये असणार आहे.

किंग्स इलेव्हनच्या सातपैकी चार मॅच मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये खेळवल्या जाणार आहेत, तर उरलेल्या तीन मॅच पुण्याच्या एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवल्या जाणार आहेत.

IPL-8 पंजाबसाठी खूप रोमांचक असणार आहे, कारण यावेळी सातपैकी तीन मॅच पुण्यातील घरच्या नवीन मैदानावर खेळणार आहे. पुण्याचे प्रेक्षक आम्हाला खूप प्रेम देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं मत सीईओ फ्रेजर कास्टेलिनो यांनी व्यक्त केले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.