कोलकात्याचा दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय

मनीष पांडे आणि युसुफ पठाणच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय मिळवलाय.

Updated: Apr 17, 2017, 08:02 PM IST
कोलकात्याचा दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय title=

दिल्ली : मनीष पांडे आणि युसुफ पठाणच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय मिळवलाय.

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. युसुफ पठाणने ५९ धावांची जबरदस्त खेळी केली. तर मनीष पांडेने ६९ धावा चोपल्या.

या विजयासह कोलकाताने पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय. दिल्ली डेअरडेविल्सने विजयासाठी १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. 

एक चेंडू आणि ४ विकेट राखत कोलकाताने हा विजय मिळवला.