लोंचं समजून खेळाडूने मागवली कॉकरोच डिश

भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने असा खुलासा केला आहे की त्याने जवळपास कॉकरोच खाण्यासाठी हातात घेतला होता पण तेवढ्यात त्याला कोणीतरी त्याची माहिती दिली.

Updated: Dec 13, 2015, 07:54 PM IST
लोंचं समजून खेळाडूने मागवली कॉकरोच डिश title=

मुंबई : भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने असा खुलासा केला आहे की त्याने जवळपास कॉकरोच खाण्यासाठी हातात घेतला होता पण तेवढ्यात त्याला कोणीतरी त्याची माहिती दिली.

भारताच्या अंडर-१९ टीमच्या कॅप्टन असताना कोहली मलेशियाला गेला होता. तेव्हा त्याने खाण्यासाठी लोंचं समजून कॉकरोजची एक थाळी मागवली होती. कोहली लोंचं समजून ते खाणारंच होता की तेवढ्यात त्याला कोणी तरी सांगितलं की त्याच्या हातात एक किडा आहे. 

२००८ मध्ये मलेशियामध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने विजय मिळवला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.