वनडे रॅकिंगमध्ये कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम

आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे रॅकिंगमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

Updated: Sep 5, 2016, 10:53 PM IST
वनडे रॅकिंगमध्ये कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम  title=

दुबई : आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे रॅकिंगमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. या क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डेव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर आहे. 

आयसीसीच्या बॅट्समनच्या रॅकिंगमध्ये टॉप 10 मध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. कोहलीबरोबर रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर आणि शिखर धवन आठव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी करणारा इंग्लंडचा जो रुट पहिल्यांदाच टॉप 5 मध्ये आला आहे. या रॅकिंगमध्ये रुट चौथ्या क्रमांकावर आहे. 

बॉलरच्या रॅकिंगमध्ये टॉप 10 मध्ये एकही भारतीय बॉलर नाही. भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन अकराव्या क्रमांकावर आहे. वनडे टीममध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर, भारत तिसऱ्या क्रमांकावर तर न्यूझिलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.