'म्हणून क्रिस गेलला टीममध्ये घेतलं नाही'

क्रिस गेल म्हणजे जगातल्या सर्वोत्तम टी 20 बॅट्समनपैकी एक. पण आयपीएलमधल्या पुण्याविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये गेलला बैंगलोरच्या संघामध्ये स्थान मिळालं नाही. 

Updated: May 8, 2016, 05:16 PM IST
'म्हणून क्रिस गेलला टीममध्ये घेतलं नाही' title=

मुंबई: क्रिस गेल म्हणजे जगातल्या सर्वोत्तम टी 20 बॅट्समनपैकी एक. पण आयपीएलमधल्या पुण्याविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये गेलला बैंगलोरच्या संघामध्ये स्थान मिळालं नाही. बैंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीनं गेलच्या टीममध्ये नसण्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

बैंगलोरच्या बॅटिंगची मधली फळी मजबूत करण्यासाठी आम्ही ट्रेव्हिस हेडला टीममध्ये घेतलं, गेलला विश्रांती द्यावी हे यामागचं कारण नव्हतं असं कोहली म्हणाला आहे. तसंच सरफराज खान हा फिट नसल्यामुळे तो ही या मॅचमध्ये नव्हता अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली आहे. 

यंदाच्या आयपीएलमध्ये बैंगलोरला चमकदार कामगिरी करता आली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये बैंगलोरची टीम सहा पॉईंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. यंदाच्या सिझनमध्ये गेलही फॉर्ममध्ये नाही, त्यामुळे बैंगलोरच्या चिंता वाढल्या आहेत. 

पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये गेलऐवजी ट्रॅव्हिस हेडला संधी मिळाली असली तरी त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीनं या मॅचमध्ये सेंच्युरी मारून बैंगलोरला जिंकवून दिलं. कोहलीची यंदाच्या आयपीएल मोसमातली ही दुसरी सेंच्युरी आहे.