...आणि कुलदीप यादव झाला भावूक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीद्वारे कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यादवने जबरदस्त खेळ करत चार विकेट घेतल्या.

Updated: Mar 25, 2017, 05:43 PM IST
...आणि कुलदीप यादव झाला भावूक title=

धरमशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीद्वारे कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यादवने जबरदस्त खेळ करत चार विकेट घेतल्या.

यादवने पहिली विकेट घेतली ती डेविड वॉर्नरची. पदार्पणातील पहिली विकेट घेतल्यानंतर कुलदीपला आपले अश्रू अनावर झाले नाहीत. डेवि़ड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांनी खेळपट्टीवर आपले पाय रोवले होते. त्यामुळे ही जोडी फोडणे आवश्यकत होते. 

अशातच कुलदीपने वॉर्नरची विकेट घेत ही जोडी फोडली आणि पदार्पणातील पहिली विकेट घेतली. कुलदीपच्या या कामगिरीचे भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही कौतुक केले. 

पाहा हा व्हिडीओ