संगकारनं द्रविडला टाकलं मागे, टेस्टमध्ये 37वं शतक

श्रीलंकेचे स्टार बॅट्समन कुमार संगकारानं आज पाकिस्तानविरोधात आपल्या शतकी खेळीदरम्यान 2014मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 रन्स करणारा पहिला बॅट्समन बनलाय. तसंच एका वर्षात सर्वाधिक सहा वेळा 2000 पेक्षा जास्त रन्स बनवण्याचा कारनामाही संगकारानं केलाय.  

Updated: Aug 9, 2014, 06:22 PM IST
संगकारनं द्रविडला टाकलं मागे, टेस्टमध्ये 37वं शतक title=

गाले: श्रीलंकेचे स्टार बॅट्समन कुमार संगकारानं आज पाकिस्तानविरोधात आपल्या शतकी खेळीदरम्यान 2014मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 रन्स करणारा पहिला बॅट्समन बनलाय. तसंच एका वर्षात सर्वाधिक सहा वेळा 2000 पेक्षा जास्त रन्स बनवण्याचा कारनामाही संगकारानं केलाय.  

संगकारनं पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी टी-टाईम ब्रेकपर्यंतच 102 रन्स बनवले होते. पाकिस्तान विरोधात 10 सेंच्युरी ठोकणारा संगकारा पहिला बॅट्समन बनलाय. त्याच्या करिअरची ही 37वी सेंच्युरी आहे. या पद्धतीनं त्यानं भारताच्या द वॉलचा म्हणजेच राहुल द्रविडचा 36 सेंच्युरी बनवण्याचा रेकॉर्ड मोडलाय. 

आता त्यांच्यापेक्षा जास्त टेस्ट सेंच्युरी सचिन तेंडुलकर (51), जॅक कॅलिस (45) आणि रिकी पॉटिंग (41) च्या नावावर आहे. संगकाराच्या नावावर आता 2014मध्ये टी-टाईम ब्रेकपर्यंत 2019 रन्स जमा झाले आहेत.  

आयसीसी टी-20 वर्ल्डकपनंतर संगकारने टी-20मधून निवृत्ती घेतलीय. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.